Pooja Chavan Suicide Case : पूजा आत्महत्याप्रकरणी भाजपचे राज्यभर आंदोलन

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी राज्यभरात आज भाजपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनारम्यान राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला 19 दिवसांचा कालावधी होऊन गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करीत नाही. ही बाब निषेधार्थ असून जोवर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी मांडली.

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली आज कळंबोलीमध्येही भाजपाच्या महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कळंबोली पोलिसांनी वेळीच धाव घेऊन महापौर चौतमोल यांच्यासह महिला व पुरुष अशा 35 आंदोलकांना ताब्यात घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.