मुंबई – पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. या आत्महत्येमागे महाविकास आघाडीमधील एक मंत्री असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, हा मंत्री कोण आहे याचा उलगडा होत नव्हता. यादरम्यान भाजपाने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्यानी केली आहे. याबाबत पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी याप्रकरणावर बोलताना सावध पवित्रा घेतला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांना थोडक्यात उत्तर देत राज्याचे मुख्यमंत्री बोलतील असे उत्तर दिल आहे. सध्या राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटया संदर्भात एक केले असून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो असे त्यांनी म्हटले आहे.