पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण;अजित पवारांकडून संजय राठोड यांची पाठराखण ;म्हणाले…

मुंबई : राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेना यावर कोणतीही कारवाई करत नाही. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगले असून त्यांचे नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. एका प्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.

“आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागेदेखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

“संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे असे आम्ही सांगितले आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचे नाव गेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही,” असेही ते म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.