दोन्ही खटल्यांवर 5 मार्च रोजी सुनावणी
पुणे – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारा आणखी एक खटला लष्कर न्यायालयात दाखल झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने हा खटला दाखल केला आहे. यापूर्वी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी पहिला खटला दाखल केला होता. दोन्ही प्रकरणात 5 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
भाजप वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. “या खटल्यात देखील कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही.
या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलीसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी आम्ही हा खटला दाखल केला आहे,’ अशी माहिती आघाडीच्या ऍड. ईशानी जोशी यांनी केली.
त्या म्हणाल्या, “पोलिसांनी अद्याप स्वतःहून तक्रार दाखल केली नाहीत. ते कोणाची वाट वाहत आहे, हे समजत नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत.’