अलाया फर्निचरवाला आपल्या लुक्सबाबत नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या लुक्समधील फोटो ती सतत अपलोड करत असते. तिने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला नाकावर सर्जरी करायची असल्याचे सांगितले होते. पण तिने अद्याप ही सर्जरी केलेली नाही आणि भविष्यात ती अशी सर्जरी करण्याची शक्यताही कमी आहे.
अलिकडेच तिने आपल्या या सर्जरीच्या शक्यतेबाबत सांगितले. पूर्वीचे आणि आताचे फोटो नीट बघितले तर नाकामध्ये फरक दिसेल. आपले नाक एका बाजूने थोडे वर उचलल्यासारखे होते. ते दुरुस्त करण्यासाठीच ही सर्जरी करायची होती. मात्र नंतर आपण हा निर्णय बदलला असे अलायाने सांगितले.
नाकावरची सर्जरी खूपच छोटी गोष्ट आहे. पण लोकांना ही गोष्ट लक्षात आली असती की नाही, हे सांगता आले नसते. पण ही सर्जरी करणे म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. नाकाच्या या आकाराकडे कोणाचेच लक्ष जाणार नाही, असे वाटल्यामुळे ही सर्जरी करण्याचा नाद सोडून दिल्याचे तिने सांगितले.