पूजा बेदी पुन्हा लग्न करणार

अभिनेत्री पूजा बेदीने घटस्फोटच्या तब्बल 16 वर्षांनतर बॉयफ्रेण्ड मानेक कॉंट्रॅक्‍टर याच्यासोबत साखरपुडा केला असून याचवर्षी या दोघांच्या लग्नाचा बार उडणार आहे. व्हॅलेन्टाईन्स डेच्या दिवशी मानेक कॉंट्रॅक्‍टरने 48 वर्षीय पूजाला प्रपोज केले होते. त्यासाठी तो तिला हॉट-एअर बलून राईडसाठी घेऊन गेला होता आणि त्याने तिथेच पूजाला लग्नाची मागणी घातली. दोघे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते.

मानेक कॉंट्रॅक्‍टर हा पूजाचा शाळेपासूनचा मित्र असून दोघांचे शिक्षण हिमाचल प्रदेशच्या द लॉरेन्स स्कूल सनावर येथे झाले. मानेक शाळेत पूजाला सीनियर होता. पण दोघेही शालेय जीवनानंतर आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. मानेक कॉंट्रॅक्‍टर मूळचा गोव्याचा आहे. त्यांची मागील वर्षी पुन्हा भेट झाली. दोघांमध्ये प्रेम झाले आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

लग्नाचे प्लॅनिंग मुलगा आणि मुलीच्या सुट्टीच्या हिशेबाने करणार असल्याचे पूजाने सांगितलं. मुलगी आलिया तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर मुलगा उमर इब्राहिम कॉलेजमध्ये आहे. दोघांच्या सुट्टीनंतर लग्नाची तारीख निश्‍चित होईल, असे तिने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.