पूजा बत्राने घेतली अल पचिनोची भेट

ऍक्‍ट्रेस पूजा बत्राने अलीकडेच हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते अल पचिनो यांची भेट घेतली. अल पचिनो यांच्याबरोबरचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अल पचिनो यांच्याबरोबर पचिनो यांचा “ऍन्ड जस्टिस फॉर ऑल’ हा सिनेमादेखील आपण बघितल्याचे पूजाने म्हटले आहे.”ऍन्ड जस्टिस फॉर ऑल’ हा सिनेमा 1979 मध्ये रिलीज झाला होता. 

हा एक कोर्ट रूम ड्रामा होता. यामध्ये अल पचिनो यांच्याबरोबर जॅक वॉर्डन आणि जॉन फोसिंथ हे देखील होते. या सिनेमाला दोन ऍकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहबरोबर लग्न केले आहे. तिने 90 दशकातील “हसीना मान जाएगी’, “नायक’, “कहीं प्यार ना हो जाये’ आणि “विरासत’ सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले होते. 

तिने 1993 साली “मिस इंडिया’चा किताब जिंकला आहे. तिच्या “ताज महाल, ऍन इटर्नल लव्ह स्टोरी’ 2004 साली कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला होता. लग्नानंतर काही वर्षे ती निवांत राहिलेली होती. आता “स्कॉड’ या ऍक्‍शन थ्रिलर फिल्ममध्ये ती दिसणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती नीलेश सहायची असणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.