पाँटिगंच्या दशकातील कसोटी संघाचे नेतृत्व ‘या’ भारतीय खेळाडूकडे

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने दशकातील ऑल स्टार कसोटी संघाची निवड केली आहे. या त्याच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची निवड केली. कोहली हा सध्या आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय व कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कोहली शिवाय या संघात अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.

पाँटिगं याने गेल्या दहा वर्षातील कामगिरीच्या आधारावर हा कसोटी संघ निवडला आहे. त्यांच्या या संघात त्याने इंग्लंडच्या ४, आॅस्ट्रेलियाच्या ३, आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी १ खेळाडूचा समावेश केला आहे.

याबाबत पाँटिगने ट्विटरवर लिहिले आहे की, ” प्रत्येकजण दशकातील आपला संघ निवडतो. त्यामुळे मीसुध्दा यामध्ये सहभागी होण्याचा विचार केला आणि माझा दशकातील कसोटी संघ निवडला.”

पाँटिंगचा दशकातील ११ जणांचा कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅलिस्टर कूक, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लियोन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

कोहली याने अद्याप पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक लगावले आहेत. तो सचिन तेंडुलकर (१००) आणि रिकी पाँटिंग (७१) यांच्यानंतर तिस-या स्थानी आहे. तसेच याआधी आॅस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाइटने देखील कोहली याची दशकातील कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड केलेली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.