सिडनी : प्रत्येक मोसमातील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता कसोटी सामन्यांचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) करत आहे. जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंकडून यास विरोध होत आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगनेही आयसीसीच्या चार दिवसीय प्रस्तावास विरोध दर्शविला आहे.
रिकी पाँटिगने याबाबत म्हटले आहे की, ” काही गोष्टीची मोडतोड करू नये. चारदिवसीय कसोटीचा प्रस्ताव देणा-यांना यामगे नेमके कोणते महत्वाचे कारण वाटते,हे मला समजून घ्यायचे आहे.”
Ricky Ponting shares his verdict on the four-day Test debate with @samuelfez | #AUSvNZ https://t.co/tB1BVUECe7 pic.twitter.com/K62hSLtt3D
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2020
दरम्यान, याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रस्तावास भक्कम पाठिंबा दिला आहे. तर पाँटिंगच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, फिरकीपटू नॅथन लियोन आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी देखील विरोध दर्शविला आहे.