मुंबई – दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-1’ (PS-2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. सिनेरसिक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे ही बातमी लोकांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट प्रसिद्ध लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
नुकतंच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर या सिनेमाचा दुसरा भाग ‘पोनियिन सेल्वन-2’ चा फर्स्ट लुक आणि रिलीज डेट उघड केली आहे. यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर देखील तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहिती नुसार, ‘पोनियिन सेल्वन 2’ चा ट्रेलर या महिन्यात 29 मार्च रोजी रिलीज होणार आहे. त्यासाठी आता फक्त 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर दुसरीकडे, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलाल, तर हा चित्रपट देखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.
पुढच्या महिन्यात 28 एप्रिलला ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात ‘चियान विक्रम, जयम रवी, कार्ती आणि त्रिशा कृष्णन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय प्रकाश राज, आर सरथ कुमार, प्रभू, पार्थियान, अश्विन काकुमानु हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात दमदार कलाकारांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.