पोनाप्पा – रांकीरेड्डी उपांत्य फेरीत

थायलंड बॅडमिंटन स्पर्धा

बॅंकॉक – भारताच्या मिश्र दुहेरीतील खेळाडूंनी शुक्रवारी अविश्‍वसनिय कामगिरी केली. सात्विक साईराज रांकीरेड्डी याने अश्‍विनी पोनाप्पाच्या साथीत मिश्र दुहेरीत खेळताना थायलंड ओपन सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक पाचव्या मानांकित मलेशियाच्या पेंग सुन चॅन व लिऊ यिंग गोह या जोडीवर 18-21, 24-22, 22-20 अशी सरळ तीन गेममध्ये मात केली. या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर फुलराणी सायना नेहवाल हिला पहिल्या फेरीत विजय मिळवता आला होता.

मात्र, त्यानंतर दुसऱ्या फेरीत तीला पराभवाचा सामना करावा लागला. तीची सहकारी खेळाडू व ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्हि. सिंधू हिने मात्र, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेत भारताला मिश्र दुहेरीसह सिंधू व समीर वर्मा यांच्याकडून पदकाची आशा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.