पुणे : आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे डाळिंब, मोसंबी, कलिंगड, खरबूज, पपई आणि जुन्या बहरातील मोसंबीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वातावरणातील बदलामुळे लिंबाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. ८) फळबाजारात जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ५० ते ६० टन, संत्री ६० ते ७० टन, डाळिंब २५ ते३० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची सुमारे २ हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरू १००० ते १२०० क्रेट, अननस ५ ट्रक, सीताफळ १० ते १५ टन, बोरांची अडीच हजार गोणी एवढी आवक झाली.