पुणे – थंडी वाढल्याने कलिंगड, खरबूज आणि लिंबाला मागणी घटली आहे. त्यामुळे तिन्ही फळांच्या भावात आणि पेरूच्या भावात घट झाली आहे.
खरबुजाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे 3 रुपये, कलिंगडच्या भावात 5 रुपये, लिंबाच्या भावात गोणीमागे 70 ते 80 रुपये आणि पेरूच्या भावात 20 किलोमागे 150 रुपयांनी घट झाली आहे.
मागणी वाढल्यामुळे डाळिंबाच्या भावात मात्र 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.
नागरपूर संत्रीचा हंगाम सुरू झाला असून, रविवारी येथील बाजारात 150 टन आवक झाली. या संत्र्याला अपेक्षित मागणी नसून, दिवाळीनंतर मागणी वाढेल, असे व्यापारी करण जाधव यांनी संगितले.
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 70-125, अननस (डझन) : 70- 270, मोसंबी : (3 डझन) : 250-450, (4 डझन ) : 100-200, संत्रा : (10 किलो) : 100-450, नागपूर संत्रा (8 ते 10 डझन) -900 रुपये, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-30, आरक्ता 20-60. कलिंगड : 5-12, खरबुज : 10-25, पपई : 5-15, चिक्कू : 100-500, सिताफळ 10-100, पेरु (20 किलो) : 150-300.