बहुगुणी मोहरी

औषधी म्हणून मोहरीचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. किंबहुना चीन, ग्रीस, रोम आणि इजिप्तमधील प्राचीन वैद्यकशास्त्रावर आधारित ग्रंथांमध्येही मोहरी अनेक तऱ्हेच्या विकारांवर औषधी म्हणून वापरले जात असल्याचे उल्लेख आहेत. आयुर्वेदामध्येही मोहरीच्या सेवनाने आरोग्याला अनेक प्रकारे लाभ होत असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे मोहरीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे मोहरीचा वापर करून तयार केलेले मोहरीचे ऑईल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते.

बहुगुणी मोहरीचे उपाय

आयुर्वेदानुसार मोहरी तेलकट असून कोरडा, कडू, तिखट, कफवातनाशक, पित्तवर्धक, वेदना दूर करणारे, गर्भाशय व हृदय यांना उत्तेजना देणारे तसंच कृमिनाशक असते. मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत. कापूरमिश्रित मोहरी तेल केसांना लावल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत, तसेच ते घनदाट होतात. रोज मालीश केल्याने डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते.

ऐकण्याची शक्ती क्षीण असलेल्यांनी दिवसातून ४-६ वेळा दोन्ही कानांमध्ये मोहरीच्या तेलाचे एक किंवा दोन थेंब घालावेत. ऐकण्याची क्षमता सुधारते.टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो.दातदुखीवर मोहरीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.

शरीरावर आलेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचं चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने लवकर आराम पडतो. मोहरी उष्ण असल्याने वाताचं शमन करते, म्हणून संधीवातावर मोहरीचं तेल अत्यंत गुणकारी असतं. लकवा, कंबरदुखी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांत रुग्णांच्या हातापायांना मोहरीच्या तेलाने मालीश करावं.

कुष्ठरोग झाला असल्यास, अंगाला खाज येत असल्यास किंवा घाम येत नसेल तर मोहरीचं तेल लावावं. बाळंतिणीलाही मोहरीच्या तेलाने मालीश करतात. थंडीच्या दिवसांत लहान मुलांचं झोपण्यापूर्वी मालीश करावं. जेणेकरून शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे आणि हाडं मजबूत होतात.दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)