‘प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही’ – जावडेकर

नवी दिल्ली – ‘प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही, याबबात कोणताही निष्कर्ष अजून पुढं आलेला नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये विनाकारण कुणी भीती पसरवू नये’. असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

देशातील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्द्यावर आज (दि. ७) लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना प्रकाश जावडेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रदूषणामुळं भारतीयाचं सरासरी आयुर्मान ४.३ वर्षांनी कमी होत असल्याचा मुद्दा संसदेत एका सदस्याने उपस्थित केला होता. दरम्यान, प्रकाश जावडेकरांनी हा समजचुकीचा असल्याचं यावेळी सांगितलं.

लोकसभेत यापूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनातही उत्तर भारतातील प्रदूषणावर अनेकदा चर्चा झाली आहे. हिवाळ्याच्या आधी या प्रदेशातील हवा बिघडते हे अनेकदा निदर्शनास आलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.