“प्रदूषण नियंत्रण’कडून पिंपळे जगतापमध्ये पंचनामा

मृत मासेप्रकरणी नुकसान भरपाईची मागणी
केंदूर (वार्ताहर) – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील एचपीसीएल कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे गावच्या पाझर तलावातील मासे मृत पडले होते. त्यानंतर प्रभातने वृत्त प्रसारित केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रदूषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

मत्स्य उत्पादक रमेश दौंडकर यांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर महसूलने पंचनामा केला आहे. दरम्यान, तहसीलदार एल. डी. शेख यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मासे मृत झाल्यामुळे तक्रादार दौंडकर यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्यामुळे दौंडकर यांनी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी
केली आहे.

प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. चौकशीसाठी तलावातील पाण्याचा नमुना घेतला आहे. संबधित कंपनीवर लवकरच योग्य ती कारवाई करणार आहे.
-उपेंद्र कुलकर्णी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.