मध्यप्रदेश – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात 11 एप्रिल पासून 19 मे पर्यंत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु आहे. देशात यापूर्वी पाच टप्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्या (१२ मे) सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून, राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भोपाळ मध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील लोकसभा उमेदवारांचे भविष्य उद्या एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.
Madhya Pradesh: Visuals of preparation from Bhopal, ahead of the sixth phase of #LokSabhaElections2019 tomorrow. 8 Lok Sabha constituencies of the state will undergo polling tomorrow. pic.twitter.com/r2O4QzwaJc
— ANI (@ANI) May 11, 2019
पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 91 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 97 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 115 जागांसाठी, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 71 जागांसाठी, पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी 51 जागांसाठी, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 59 जागांसाठी आणि सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांसाठी मतदान होणार आहे.