मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्गाटना करून गेल्यापासून कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना खासदार वियाणक राऊत यांनी राणे कुटुंबाला डिवचणारी टीका केल्यानंतर राणे पुत्र निलेश राणे यांनी राऊत यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच खासदार विनायक राऊत यांनी खोचक टीका केली आहे. नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला होता. या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
चप्पल चोर शिवसेना खासदार विन्या राऊतवर प्रतिक्रिया. pic.twitter.com/4k2NFkXNFT
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 9, 2021
भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल आता नवीन थापा झालाय अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. तसेच भाषा बदलली नाही तर जिथे दिसशील तिथे फटके खायला घालणार अशी धमकीही निलेश राणे यांनी राऊतांना दिली आहे.