नवी दिल्ली: जेव्हा इंदिरा गांधी लेहला गेल्या होत्या. तेव्हा पाकिस्तानला दोन भागात विभागले गेले होते. आता मोदी काय करतील ते पाहूया, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौऱ्यावर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. मनीष तिवारी यांनी इंदिरा गांधींच्या लेह दौर्याचा एक फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोत इंदिरा गांधी जवानांना संबोधित करताना दिसत आहेत.
After she visited Leh she sliced Pakistani into two. Let us see what he does ? https://t.co/m7XfzNenE8 pic.twitter.com/i5iYnOc54J
— Manish Tewari (@ManishTewari) July 3, 2020
भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील लेह येथे भेट दिली. त्यांनी सीमेवरील सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून चीनला इशारा दिला. विस्तारवादाचे युग संपले. विस्तारवाद हा जागतिक शांतता आणि संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे. विस्तारवादाने मानवजातीचा नाश केला. संपूर्ण जगाने विस्तारवादाच्या विरोधात आपले मन तयार केले आहे. आता ही विकासवादाची वेळ असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.