राष्ट्रवादीच्या बैठक दौऱ्यास पुरंदरमध्ये प्रारंभ
बेलसर – आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी आता रिंगणात उतरून आपले पक्षबळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणामुळे आता जवळपास उमेदवार अंदाजीत निश्चित झालेले पाहावयास मिळत आहेत; परंतु पक्ष संधी कोणास देणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठक दौऱ्याचा प्रारंभ वनपुरी व उदाचीवडी (ता. पुरंदर) येथून रविवारी (दि 31 जुलै) करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे धोरण व पक्ष संघटना वाढी संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोळविहिरे-बेलसर गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य रहावेत आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गाव बैठक दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, सोमेश्वरचे संचालक बाळासाहेब कामठे, बापू भोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सरपंच नामदेव कुंभारकर, अमोल कामठे, बाबुराव पिलाने, सोमनाथ खोमणे, सोमनाथ कुंभारकर, निलेश महामुनी प्रताप कुंभारकर, सुहास कुंभारकर तसेच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.