डोर्लेवाडी – खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.26) सांगवी, डोर्लेवाडी जिल्हा परिषद गटातील गावभेटीचा दौरा केला आहे. सोमवारपासून शारदीय नवरात्री उत्सवाला देखील सुरुवात झाली आहे. त्यांनी जिल्हा परिषद गटातील झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी, सोनगांव, मेखळी, नीरावागज आदी तेरा गावांतील ग्रामस्थ, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.अनेक गावातील देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले आहे. सुळे यांच्या नवरात्रोत्सवात राजकीय नवरंग पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजप दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सुळे यांचा दौरा सुरू झाल्याने सुप्रिया सुळे यांनी भाजप दौऱ्याची धास्ती घेतली आहे काय? अशी चर्चा होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नुकताच भाजपच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दौरा केला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपाकडून बारामती मतदारसंघ टार्गेट केला आहे. कुठल्याही परिस्थितीत बारामती मतदारसंघ जिंकायचाच, असा चंग भाजपच्या केंद्र आणि राज्यातील वरिष्ठांनी बांधला आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बारामती तालुक्यात सातत्याने दौरे सुरू केले आहेत. त्यांनी बारामती तालुक्याच्या दौरा केला.
आरोप करायचा अधिकार सगळ्यांचा आहे. डेटा पिच ऑफ सेल्फ गेली तेरा वर्षे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार आहे. याअगोदर मी किती दौरे केले आहेत, हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे विरोधकांना तेवढा तर अधिकार आहेच. आणि त्यांना टीकेला दुसरे काही कारण नाही. काहीतरी टीका करायची म्हणून ते असे आरोप करतायात.
– सुप्रिया सुळे, खासदार, बारामती.