Madhukar Pichad Passed Away | मधुकर काशिनाथ पिचड यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पिचड यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ राजकीय नेते अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १९४१ साली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून बी.ए. एलएल.बी. पदवी प्राप्त केली आणि विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
पिचड यांची राजकीय कारकीर्द: | Madhukar Pichad Passed Away
जिल्हा परिषद सदस्य : १९७२ साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि अकोले तालुका पंचायत समितीचे अध्यक्षपद भूषविले.
विधानसभा सदस्य : १९८० ते २०१४ या कालावधीत त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी सात वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला.
विरोधी पक्षनेते : मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
मंत्रिप द: त्यांनी आदिवासी विकास, दुग्ध विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य केले.
काँग्रेस ते भाजप | Madhukar Pichad Passed Away
काँग्रेस: सुरुवातीला त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९८० ते १९९९ या काळात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते सहभागी झाले आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदही भूषविले.
भारतीय जनता पक्ष : २०१९ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सहकार क्षेत्रातील योगदान :
अमृतसागर दूध संघ: १९६१ साली त्यांनी अमृतसागर दूध सहकारी संघाची स्थापना केली.
अगस्ती सहकारी साखर कारखाना: १९९३ साली त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली, जो भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना मानला जातो.
नवीन घडामोडी:
ऑक्टोबर २०२४ मध्ये मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांचा हा प्रदीर्घ लढा अयशस्वी ठरला असून त्यांची प्राणज्योत मालवली आहे. | Madhukar Pichad Passed Away