राजकीय हस्तक्षेपावरून फेसबुक संशयाच्या फे-यात

फेसबुकचे प्रवक्ता लिझ बर्जुओइस यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले

डेटा लीक व हेरगिरीसारख्या गंभीर आरोपांचा सामना करत असलेली फेसबुक कंपनी आता राजकीय हस्तक्षेपावरून संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. फेसबुकने जगभरात आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे राजकीय हस्तक्षेपाला प्रोत्साहनच दिले असे नाही तर त्याला पाठिंबाही दिला, असा आरोप कंपनीवर झाला आहे.

फेसबुकने २५ वर देशांत नेत्यांना आपल्या विरोधकांना त्रस्त करण्यासाठी तसेच जनतेलाही भ्रमित करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी खुली सूट दिली. हा खुलासा फेसबुकच्या माजी डेटा सायन्टिस्ट सोफी झांग यांच्या हवाल्याने केला. कंपनीने सप्टेंबर २०२० मध्ये खराब कामगिरीमुळे सोफींची हकालपट्टी केली होती. सोफींना जानेवारी २०१८ मध्ये फेक एंगेजमेंट रोखण्यासाठी नियुक्त केले होते. दरम्यान, फेसबुकचे प्रवक्ता लिझ बर्जुओइस यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकने अमेरिका वा इतर संपन्न देशांना प्रभावित करण्यासाठी गरीब, लहान आणि गैर-पाश्चिमात्य देशांना आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करण्याची परवानगी कशी दिली याची माहिती सोफी यांनी दिली. कंपनीने अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया आणि पोलंड यांसारख्या देशांत राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या मुद्द्यांबाबत तत्परता दाखवली, तर अफगाणिस्तान, इराक, मंगोलिया किंवा मेक्सिको, लॅटिन अमेरिकेच्या देशांच्या प्रकरणांत मुळीच हस्तक्षेप केला नाही.

मोठ्या संख्येत खोटे दावे खासगीपणे, बिझनेस हाऊस व ब्रँड्सद्वारे केले जात आहेत, पण त्याचा वापर राजकीय लक्ष्य करण्यासाठीही केला जात आहे असे आढळल्याचे सोफी यांनी सांगितले. त्यांनी होंडुरास या देशाचा हवाला देत सांगितले की, राष्ट्रपती जुआन अर्नाल्डो हर्नांडेझ यांनी २०१८ मध्ये आपल्या समर्थनार्थ ९० टक्क्यांपेक्षा जास्त फेक एंगेजमेंट आपल्या कार्यालयातूनच पोस्ट केल्या होत्या. त्याची संख्या लाखात होती. आपण त्याची तक्रार केली होती, पण फेसबुकने कारवाई केली नाही.

फेसबुकवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करणाऱ्या सोफी झांग यांनी कामाच्या शेवटच्या दिवशी ७८०० शब्दांचे कडक पत्र लिहिले. त्यांनी म्हटले की, या खुलाशामुळे जगातील इतर देशांवरही परिणाम होईल आणि लोक जास्त जागरूक होतील, कारण कंपनी या प्रकरणाची दखल घेत नाही. त्यांनी २०१६ च्या अमेरिकी निवडणुकीचाही उल्लेख केला, त्यात मतदारांच्या विभाजनासाठी फेसबुकच्या विरोधात अनेक प्रकारच्या जोडतोडीचे पुरावेही दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.