कोल्हापुरात राजकीय भूकंप; बडा नेता ठाकरेंची साथ सोडत ‘कमळ’ घेणार हाती

Maharashtra Politics | भारतीय जनता पक्षाकडून कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. संजय घाटगे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यातच आता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संजयबाबा घाटगे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती. त्यामुळे संजय घाटगे यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जात नसल्याचा सवालही उपस्थित केला जात होता. संजय घाटगे यांनी त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांना पाठिंबा देणं अपेक्षित होते. पण त्यांनी महाविकास आघाडीत असूनही मुश्रीफांसाठी काम केल्याची चर्चा होती.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
कागल हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी निवडणुक जिंकली. त्यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव केला होता.
तर संजयबाबा घाटगे विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या संपर्कात होते. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गट आणि आता भाजप असा घाटगे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तब्बल सहा विधानसभा निवडणुका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात संजय घाटगे लढले. यात त्यांना १९९८ च्या पोटनिवडणुकीत एकमेव विजय मिळवता आला होता. Maharashtra Politics |
दरम्यान, संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपात प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. Maharashtra Politics |
खैरे आणि दानवे आरोप-प्रत्यारोप
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरेंचे खंदे समर्थक चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद समोर येत आहेत. याशिवाय आता कागलच्या माजी आमदाराने देखील पक्षाला रामराम केल्यास ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Maharashtra Politics |
हेही वाचा:
मेहुल चोक्सीला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी बारबरा जबारिका नेमकी कोण? ; वाचा फसवणूक, अपहरणाची खोटी कहाणी





