नवी दिल्ली: भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षातील जेष्ठ नेत्यांना वयाचा हवाला देऊन उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अनेक जेष्ठ नेत्यांना घरी बसवले आहे. त्यामुळे पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले अनेक नेते नाराज झाले आहे.
दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते ‘मुरली मनोहर जोशी’ यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली असून, या दोन्ही नेत्यानंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजून येते.
लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने यावेळी उमेदवारी दिलेली नाही. या नेत्यांची उमेदवारी नाकारली गेल्यानंतर यांना आपली नाराजी लपवता आलेली नाही. त्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी एक “नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स, सेल्फ लास्ट” ब्लॉग प्रकाशित करून पक्षातील नव्या नेतृत्वाला चांगलाच डोस पाजला.