Political Crisis : पंजाबच्या राजकारणात (Political Crisis) कधीही न घडलेली उलथापालथ पाहायला मिळत आहे. खासदार राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच, हरियाणा ‘आप’चे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत पंजाबचे तब्बल २८ आमदार पक्ष सोडण्याच्या (Political Crisis) तयारीत असून, भगवंत मान सरकार सध्या ‘व्हेंटीलेटर’वर आहे. पक्षात अंतर्गत कलह आणि मारहाणीचे आरोप? जयहिंद यांनी केवळ पक्षांतराचा दावा केला नाही, तर पक्षात खासदारांना मिळणाऱ्या वागणुकीवरही गंभीर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, पक्ष सोडणाऱ्या खासदारांसोबत गैरवर्तन आणि मारहाण करण्यात आली होती. नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जात असल्यामुळे पक्षात अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. Political Crisis ‘ऑपरेशन लोटस’ की विश्वासघात? या घडामोडींनंतर (Political Crisis) दिल्लीपासून पंजाबपर्यंत हालचालींना वेग आला आहे. पंजाबचे मंत्री बलवीर सिंह यांनी मनिष सिसोदीया यांची भेट घेतल्यानंतर भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’ राबवत असल्याचा थेट आरोप केला. या खासदारांनी पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली. कायदेशीर कारवाईचा बडगा दुसरीकडे, पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी पक्षाची बचावात्मक भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी ‘आप’ लवकरच राज्यसभा अध्यक्षांकडे पत्र देणार आहे. चीमा यांनी असाही दावा केला की, केवळ तीन खासदार भाजपमध्ये गेले असून, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता यांच्या सह्या बनावट आहेत. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार असताना, भाजपने टाकलेला हा डाव मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.