जळगाव : भाजपचे संकटमोचक म्हणून परिचीत असलेले्या गिरीश महाजनाच्या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने संख्याबळ नसताना महापालिकेत सत्ता काबीज केली. अडीच वर्षातच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर इथं अजब राजकीय योगायोग घडला आहे.
भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहे. तर त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.
जळगाव महापालिकेत ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.