Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रारी एसआयटीकडे केली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दाव्यामुळे तपासाला नवे आणि गुंतागुंतीचे वळण मिळाले आहे.

Ashok Kharat Case : राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका?

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात प्रकरणातील धागेदोरे तपासत असतानाच ही तक्रार समोर आल्याने एसआयटी अधिक सतर्क झाली आहे. मात्र, या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि कितपत खोडसाळपणा आहे, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ सुरूच (Ashok Kharat Case)

दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलांसाठी आणि इतर नागरिकांसाठी एसआयटीने हेल्पलाईन सुरू केली असून त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

माझं मरण इथेचं : अशोक खरात (Ashok Kharat Case)

इतरांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात स्वतःच्या भवितव्याबाबतच साशंक असल्याचे दिसून येत आहे. चौकशीदरम्यान “मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत खरातविरोधात 15 गुन्हे दाखल झाले असून तिसऱ्या गुन्ह्यात त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने एसआयटीकडून ज्या शक्यता आहे त्यांची पडताळीकरून कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला! पुढील पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी इशारा