शेती पंप सौरऊर्जेवर आणण्याचे धोरण – ऊर्जामंत्री

पुणे – यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची शासनाची योजना आहे. पुढच्या 5 वर्षांत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)चा 35 वा वर्धापनदिन ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाजनकोचे सल्लागार व संचालक पुरुषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले, देशातील सर्वांत जास्त अपारंपरिक ऊर्जानिर्मिती महाराष्ट्र करतो. सन 2024 पर्यंत 175 गिगा वॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी देशासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील. गेल्या पाच वर्षांत शासनाने राज्यातील वीज नसलेल्या 19 लाख कुटुंबियांना वीज देण्याचे काम केले आहे. राज्यासह देशाची प्रगती ही ऊर्जा निर्मितीवर अवलंबून असते. जे राज्य प्रतिमाणसी अधिक ऊर्जेचा वापर करते, ते राज्य प्रगत म्हणून ओळखले जाते. आपल्याला महाराष्ट्राला सर्वांत अग्रेसर ठेवायचे आहे. त्यासाठी महाऊर्जा राज्याला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने शासनाने धोरण तयार कले आहे. त्याच बरोबर स्वस्त वीजनिर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.