दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
आंदोलंकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. यात विध्यार्थ्याबरोबरच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आताच मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित झाले आहे .
विद्यार्थ्यांच्या आंदोलंनामुळे बंद केलेले जनपथ मेट्रो टेंशन पुन्हा सुरु झाले आहे. अशी माहिती दिल्ली मेट्रोच्या ट्विटरवर देण्यात आली आहे. डीएमआरसी नुसार सर्व स्टेशन सुरळीतपणे चालू झाले आहे.पोलिसांनी डीएमआरसी पटेल चौक, जनपथ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.