मंचर – जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील पोलीस पाटील योगेश जाधव यांना शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदेश जयसिंग गुंड, विनायक रघुनाथ गुंड, संतोष विनायक गुंड (तिघे रा.जाधववाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पोलीस पाटील योगेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, जाधववाडीच्या हद्दीत जाधव आणि रंजीत वाबळे हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी संदेश विनामस्क चौकामध्ये बसला होता.
त्यामुळे पोलीस पाटलांनी त्यांना विनामास्क बसू नको, घरी जा, असे सांगितल्याचा राग येऊन संदेशने पोलीस पाटील जाधव यांना शिवीगाळ केली. त्यावेळी वाबळे यांनी तू सरकारी कामात अडथळा आणू असे सांगितले असता संदेशने शिवीगाळ करीत जाधव यांना मारहाण केली. याबरोबरच विनायक, संतोष यांनीही जाधव यांना शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले.