पुणे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपुर्वी साडे बाराशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली व प्रशासकीय बदली झालेल्या काही नाराज पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्तांकडेच दाद मागण्यासाठी गर्दी केली होती. शेकडो पोलीस कर्मचारी आपली कैफीयत घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीन बाहेर रांगेत उभे होते. यामुळे पोलीस आयुक्तालयातील वातावरण गरमा गरम झाले होते. दरम्यान या सर्वांना सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांच्याकडे पाठवण्यात आले.
पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय, पोलिस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये सहा वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलिस प्रशासनाकडून सातत्याने बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलिस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर साडे बाराशे पोलिसांच्या बदल्यांचा आदेश शनिवारी काढला. त्यामध्ये तिन्ही प्रकारच्या पोलिसांचा समावेश होता.े सोमवारी सकाळपासूनच मुदतपुर्व व प्रशासकीय बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तालयामध्ये गर्दी केली होती. या बदलीमध्ये 476 पोलीस हवालदार ,323 पोलीस नाईक, 352 पोलीस शिपाई, 56 विनंती बदल्या आणी 82 सहायक पोलीस फौजदार यांचा समावेश आहे.
“नियमानुसारच बदल्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे “डिफॉल्ट रिपोर्ट” नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे, त्यांचा विचार केला जाईल. अन्यथा इतरांना बदलीच्या ठिकाणी जावेच लागेल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे