मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. यानंतर राज्य सरकारने 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली झाली आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या.