पुणे : मावळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाच्या वतीने पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबरला नागपूर येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन करत आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनाही पोलीस पाटलांनी निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांना या मोर्चात पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे असे पोलीस पाटलांनी निवेदन दिले.
यावेळी राज्य संपर्कप्रमुख अरुण दादा केदारी, जिल्हा विभागीय अध्यक्ष दत्ताभाऊ वाल्हेकर, तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष संजय जी जाधव, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव शितोळे, कार्याध्यक्ष गुलाबराव आंबेकर, पाटील तालुका सचिव शांताराम सातकर, पाटील उपाध्यक्ष श्रीकांत जि वाळुंजकर, पाटील सह खजिनदार महेश चौधरी पाटील, बाजीराव पवार पाटील, नवनाथ जांभुळकर पाटील उपस्थित होते