लोणावळा – कोणत्याही स्वरूपाचा परवाना नसताना चार चाकी वाहनामधून बेकायदेशीर रित्या बियरचे बॉक्स वाहतूक करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रुपेश पांडुरंग पातेरे (वय 29, रा. इंदिरानगर, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे कॅन्स्टेबल मनोज मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी (दि. 7) सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास न्यू तुंगार्ली हद्दीमध्ये अशोका हॉटेलसमोर सार्वजनिक रोडवर वरील कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीची मोटार (एम. एच. 14 डी. एक्स. 5679) व 22 हजार 920 रुपये किमतीचे बियरचे एकूण नऊ बॉक्स असा एकूण 3 लाख 22 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस कॅन्स्टेबल राजेंद्र मदने, पवन कराड, मनोज मोरे, अजीज मेस्त्री यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता. या प्रकरणी आरोपी रुपेश पातेरे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस हवालदार सामिल प्रकाश तपास करीत आहेत.