नगर – जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व दाखल झालेल्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 30 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह एकाला अटक करण्यात आली. सज्जन किसन नार्हेडा (वय-26) व तुकाराम रामराव ढोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे नगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांच्या भावास जामखेड येथे एका गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यास पोलीस कास्टडी रिमांड घेतली आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती तक्रारदार यांनी 50 हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच ही रक्कम ढोले याच्याकडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज (दि.5) रोजी लाचलुलपत विभागाने सापळा लावला. यावेळी तक्रारदार ढोले यास 30 हजार रुपये देत असता ताब्यात घेतले.