पोलिस उपनिरीक्षकासह (PSI) शिपायास 10 हजाराची लाच घेताना एसीबीने केली अटक

नाशिक – 10 हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायास अटक केली आहे. नाशिक मधील अंबड पोलीस ठाण्यातील हे पोलिस कर्मचारी आहेत. एसीबीच्या या कारवाई नंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

कैलास सोनवणे पोलीस उपनिरीक्षक व दीपक वाणी पोलीस शिपाई असे लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार महिलेचे सिडको भागात कापड विक्रिचे दुकान आहे. महिलेच्या या दुकानावर सोनवणे आणि वाणी यांनी कारवाईची धमकी दिली होती. त्यानंतर महिला जामिनवर सुटली होती. तेव्हा या दोघांनी महिलेकडे 15 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र त्याआधी एसीबीने यांना रंगेहात पकडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.