गडचिरोलीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू

चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश

गडचिरोली – गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त असून यामध्ये 4 ते 5 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून चकमकीनंतर पोलिसांच्या सी-60 पथकाकडून तिथे कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्‍यातील गरंजी डोंगरात ही चकमक झाली. यामध्ये एक नक्षलवादी ठार झाल्याचे पोलीस सुत्रांकडून कळते. मात्र, मोठ्या प्रमाणावर आणि बराच काळ ती सुरु राहिल्याने यात आणखी 4 ते 5 नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

येथील दंडकारण्यात 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांसाठी शहीद दिवस पाळत नक्षलवाद्यांनी बंद पुकारला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या सी-60 पथकाकडून सध्या येथे कोबिंग ऑपरेशन सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.