बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करावी

कराड – गेल्या काही दिवसांपासून कराड बसस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने बसस्थानक पोलिस चौकीत आवश्‍यक बंदोबस्त ठेवून प्रवाशांची सुरक्षितता कायम ठेवावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, उपजिल्हा अध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, शहर अध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे अमोल कांबळे, झुंजार यादव, नितीन महाडिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी व विद्यार्थी येत असतात. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकातील गुन्हेगारी घटनात वाढ झाली आहे. बसमध्ये चढताना मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. नुकतेच एका सराफ व्यवसायिकांना मारहाण करून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानकातील पोलीस बंदोबस्तात वाढ करून प्रवाशांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. येथे रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. याचा विद्यार्थिनी-महिलांना त्रास होतो. पोलिसांनी मद्यपी व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.