अजबच ! ज्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला तो व्यक्ती चौकात चहा पिताना दिसला; पोलीसही हैराण

लखनऊ – उत्तर प्रदेशात एक अजब घटना घडली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला तो व्यक्ती गावातील चौकात चहा पिताना दिसल्याने नातेवाईकांसह पोलीस हैरान-परेशान झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर सलेमपुर पोलिसांनी कुटुंबीयांच्या ओळखीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मात्र, जो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता, तो व्यक्ती गावातील एका चौकात चहा पिताना दिसला. यानंतर पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. ही माहिती समजताच व्यक्तीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन थांबविले आणि पुढील तपास सुरू केला आहे.

सलेमपूर क्षेत्रातील धनौती रेल्वे क्राॅसिंगजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढलून आला होता. उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुटुंबियांच्या ओळखीने मृताची ओळख पटविण्यात आली. तो मलई ठाणा क्षेत्राच्या श्रीनगर गावातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठीची तयारी सुरू झाली होती. तसेच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्काराची देखील तयारी करण्यात आली होती.

मात्र, त्याच दरम्यान तो व्यक्ती गावातील एका चौकात चहा पिताना दिसले. लगेच त्यांच्या कुटुंबीयांना व्हिडीओ काॅल करून माहिती दिली असता मृतदेहाचे शवविच्छेदन थांबविण्यात आले तसेच अंत्यसंस्काराची प्रक्रिया थांबविण्यात आली. या घटनेमुळे कुटुंबीयांसह पोलीस हैराण-परेशान झाले. पोलीस मृतदेहाची खरी ओळख पटवित आहेत. पुढील तपास सलेमपूर पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.