कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा घातला. या कारवाईत हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच 11 हजार 350 लिटर कच्चे रसायन एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईवेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोधमोहीम राबवली असता सुमारे 75 लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे अशी माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत रसायनाचा मोठा साठा केलेला आढळला. या कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अत्पादन शुल्क, कोल्हापूर, निरीक्षक भरारी पथक, हातकणंगले, शाहुवाडी, कागल, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी व पोलीस विभागाकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस अशा 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.