पोलिसांचे पगार पुन्हा एसबीआयमध्ये

मुंबई : काही वर्षापासून पगार ऍक्‍सिस बॅंकेतून होणारेच पगार आता स्टेट बॅंकेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे याबाबत मोठी चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पोलिसांचे पगार ऍक्‍सिस बॅंकेतून करण्याचे आदेश निघाले होते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या ऍक्‍सि बॅंकेत कार्यरत असल्याने त्यांना लाभ मिळावा, य हेतूने हा निर्णय घेतल्याचे आरोप झाले होते. मात्र, फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अलीकडेच अमृता फडणवीस यांनीट्विट करून निशाणा साधला होता. त्यात त्यांनी ठाकरे आडनाव लावले म्हणून कोणी ठाकरे होत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याला शिवसेनेने सडेतोड उत्तर दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे पगार ऍक्‍सिस बॅंकेऐवजी स्टेट बॅंकेतून करण्याचा निर्णय शिवसेने घेतला आहे. त्यामुळे ऍक्‍सिस बॅंकेच्या माध्यामातून शिवसेनेने अमृता फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याचे मानण्यात येत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.