इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफेच्या मालकासह कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.
याबाबत पोलिस शिपाई वैभव रविंद्र गरड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (ता.21) रोजी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना गोपणीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कॅफेचालक हे कॅफेमध्ये प्लायवडू कप्पे करून महिला व पुरुष ग्राहकांना एकत्र बसण्यासाठी परवानगी देतात.
तसेच कॅफेमध्ये अंधार करुन जागा उपलब्ध करुन देतात अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस हवालदार नितीन तांबे, लक्ष्मण साळवे, सुनील कदम, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा निमगिरे, काजल शेळके यांच्यासह छापा मारीत स्टार कैफे चालक अभिजीत दत्तात्रय लोकरे (रा. पडस्थळ ता.इंदापूर), कैफे क्रन्च चालक संकेत मारुती माने (रा.पारेकरवस्ती वनगळी ता. इंदापुर), स्माईल कैफे चालक सुहास कृष्णदेव खामगळ (रा.रामवाडी, वडापुरी ता. इंदापुर)यांनी त्याचे कैफे मध्ये प्लायवुडचे पार्टीशियन चे कप्पे तयार केलेले आढळून आले.
तसेच सदर कप्यामध्ये कंपार्टमेट करुन त्या ठिकाणी पडदे लावलेले होते. तसचे सदर कैफे मध्ये प्रकाश व्यवस्थेची सोय केलेली नव्हती.यावेळी कैफे मध्ये असलेल्या पाच जणांसह तिन्ही मालकांना ताब्यात घेत नोटीस देत पुढील कार्यवाही करण्यात आली.तर त्या ठिकाणच्या महिला,मुली पोलिस आल्याचे पाहून निघून गेल्या.अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.