नगर – शहरातील गांधी मैदानाशेजारी असलेल्या भगत गल्ली येथे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून तीन महिलांची सुटका केली असून, एक सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार (दि.24) रोजी रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील गांधी मैदानाशेजारीच असलेल्या भगत गल्ली या ठिकाणी सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यांनी खासगी वेशात आपल्या पथकातील पोलिसांना पाठवून खात्री केली. त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी तीन अत्याचारित महिला या ठिकाणी आढळून आल्या. त्यांची सुटका करत पोलिसांनी एका सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे.