फार्महाऊसवर सुरू असलेल्या खासगी डान्सबारवर पोलिसांचा छापा

वेश्या व्यवसाय सुरू असल्याचेही निष्पन्न ; महापालिकेतील ठेकेदारांसह 9 जणांना अटक

पुणे :  कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुडजे गावातील एका फार्महाऊसवर मध्यरात्री सुरू असलेल्या खासगी डान्सबार छापा टाकून उत्तमनगर पोलिसांनी महापालिकेशी संबंधीत काही ठेकेरांसह 9 जणांना अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी वेश्याव्यवसाय देखील सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी पाच पिडीत तरूणींची सुटका करण्यात आली आहे.

समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (39, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (26, रा. मिलिंदनगर, सांताकु्रझ, मुंबई), मंगेश राजेंद्र शहाणे (32, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (25), निलेश उत्तमराव बोधले (29, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी) यांच्यासह निखील सुनिल पवार (33, रा. पर्वती दर्शन), सुजित किरण आंबवले (34४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (24, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) समीर पायगुडे, विवेकानंद बडे आणि प्राजक्ता जाधव हिला न्यालयाने 3 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुडजे गावात असलेल्या लबडे फार्महाऊसवर काहीजण डीजेच्या तालावर तरूणींना नाचवत असल्याची माहिती सुत्रांमार्फत उत्तमनगर पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी कुडजे गावतील लबडे फार्महाऊसवर बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी डीजेच्या तालावर तरूणी नाचत असल्याचे त्यांना आढळले. तसेच या ठिकाणी वेश्याव्यावसायही सुरू असलेल्याचे पोहिसांना आढळले.

यावेळी पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली. तर पाच तरूणींची यावेळी सुटका केली. यावेळी मुलींना मुंबईहून पुण्यात आणणार्‍या प्राजक्तासह समीर पायगुडे, विवेकानंद बडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. . याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ज्योती लक्का यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. तिघांनाही 3 मे पर्यंत पोलिस कोठडी झाली आहे.

सुटका करण्यात आलेल्या तरूणींमध्ये एक तरूणी ही पुण्यातील असून इतर 3 तरूणी मुंबई, कल्याण, आणि ठाण्यातील आहेत. यापैकी सुटका करण्यात आलेल्या तरूणीपैकी एक तरूणी सिलीगुडीची ती मुंबईतच राहण्यास आहे. तिने इतर 4 पिडीत तरूणींशी संपर्क साधून त्या प्राजक्ता मार्फत फार्महाऊसवर आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने रेक्यु फाऊंडेशनला करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.