आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलीस संरक्षण

शिक्रापूर – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे धमकी दिल्याची घटना घडल्यानंतर घटनेचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले. यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आमदार अशोक पवार यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस तैनात केले आहेत.

धमकी प्रकरणानंतर शिरूर हवेली मतदार संघात अनेक ठिकाणी निषेध नोंदवत आमदार अशोक पवार यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तात्काळ याबाबत दखल घेत आमदार अशोक पवार यांच्या संरक्षणासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे; मात्र पोलीस प्रशासनाने आमदारांच्या सुरक्षेबरोबर निनावी पत्र देऊन धमकी देणाऱ्या समाज कंटकाचा शोध घेऊन त्याचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. याविषयी शिरूर तालुक्‍यातील महिलांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन दिले आहे.

“पोलीस विभागात मनुष्यबळ कमी असून पोलिसांवर कामाचा ताण आहे. सध्या माझ्या संरक्षणासाठी पोलीस माझ्या सोबत राहत आहेत; परंतु जनताच माझी रक्षक आहे.”
-अशोक पवार, आमदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.