गावात सलोखा राखण्याचे काम पोलीस पाटलांनी करावे

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांचे आवाहन

अवसरी- पोलीस पाटील हा पोलीस आणि ग्रामस्थांमधील समन्वय साधण्याचा दुवा आहे. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांनी केले.

नांदूर (ता. आंबेगाव) येथे आयोजित पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा व तालुका कार्यकारणी निवडप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी सभापती भालेराव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब शिंदे होते. पोलीस पाटील संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ नवले यांनी आंबेगाव तालुकाध्यक्षपदी रवींद्र विश्‍वासराव यांची निवड केली. मावळते अध्यक्ष लहू इंदोरे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विश्‍वासराव यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. गावागावात असणारे गट-तट बाजूला ठेवून सलोखा निर्माण करुन गावची एकी टिकवावी. हे करीत असताना चारित्र्यहनन होणार नाही आणि भ्रष्टाचाराचा डाग लागणार नाही याची काळजी पोलीस पाटील यांनी घ्यावी, असे आवाहन संघटनेचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले.

यावेळी विश्‍वासराव यांनी आंबेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर केली. उपाध्यक्षपदी राजाराम साळवे, कार्याध्यक्षपदी संदीप आढाव, रामचंद्र नाईक, सचिवपदी बबुशा वाघ, सहसचिवपदी उत्तम जाधव, प्रसिद्धीप्रमुखपदी अमित शेवाळे, सदस्यपदी सुहास आवटे, योगेश जाधव, राजीव झोडगे, सविता माठे, कल्पना चौधरी, वैशाली माठे, ज्योती गवारी, सल्लागार रोहीदास सोनवणे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमात युवा नेते अंकित जाधव, पोलीस पाटील संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर, महिला विभागाच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर, सदस्या अनिता वाजे, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, नवनाथ धुमाळ, विठ्ठल वळसे पाटील, सचिन बारवकर, प्रकाश लोंढे, मोनिका कचरे, संतोष शिंदे, सरपंच शेखर चिखले, तुकाराम वायाळ, बजरंग वायाळ, सुदाम भालेराव, संजय शिंदे, राजेंद्र जाधव, स्वप्नील जाधव, बाळशीराम वायाळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, माजी पोलीस पाटील गुलाब चिखले, बळीराम आवटे, यशवंत वायाळ, बाळू वायाळ, रवींद्र चिखले, राजेंद्र चिखले आदींसह आंबेगाव, खेड, जुन्नर, हवेली तालुक्‍यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास कहडणे यांनी केले तर अंकित जाधव यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)