शिक्रापूर : सध्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना या ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून पोलीस पाटलांना संधी देण्यात यावी याबाबतचे निवेदन शिरूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार अशोक पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिरूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नुकतीच आमदार अशोक पवार यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले असून यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड, पोलीस पाटील संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब शेलार, उपाध्यक्ष किरण काळे, संघटक प्रकाश करपे, संतोष लेंडे, कृष्णा गजरे, माजी अध्यक्ष पांडुरंग नरके पोलीस पाटील उपस्थित होते.
तर यावेळी पोलीस पाटलांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या निवेदनात सध्याच्या कोरोनाच्या संकट काळामध्ये सर्व गावातील पोलीस पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्याचे काम चांगल्या पद्धतीने केलेले असून सर्व पोलीस पाटील जबाबदारीने ते काम पार पाडत आहेत. तसेच अनेक पोलीस पाटील हे उच्चशिक्षित असून सर्वांनाच प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आहे.
त्यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू असताना या सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीवर पोलीस पाटील यांना संधी देण्यात यावी असे पोलीस पाटलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले असून प्रशासक पदासाठी पोलीस पाटलांची शिफारस करण्याचे निवेदनात म्हटले आहे.