लग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापणाऱ्या पोलिसाची ‘ज्युनियर’ पवारांकडून प्रशंसा

‘आबांसारखी’ मेगा पोलीस भरती लवकरच – रोहित पवार

पुणे – कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच आर आर पाटील उर्फ आबा यांच्या काळात झालेल्या मेगा पोलीस भरतीची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, मराठवाड्यातील एका पोलिसाने आपल्या लग्नपत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा फोटो छापला होता. गेल्या शनिवारी पार पडलेल्या या लग्नाची पत्रिका ‘आबांच्या’ फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

दरम्यान, या प्रकरणाची दखल आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे घेतली असून त्यांनी या लग्नपत्रिकेचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या संदेशामध्ये रोहित पवारांनी लग्नपत्रिकेवर आर आर पाटील यांचा फोटो छापणाऱ्या जाधव बंधूंची प्रशंसा केली असून राज्यातील हजारो तरुणांच्या ‘आबांविषयी’ अशाच भावना असल्याचं म्हटलंय.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आर आर पाटील यांच्याच विचारांचे असून त्यांच्या काळात झालेल्या मेगा पोलीस भरतीची राज्यात लवकरच पुरावृत्ती होईल असा शब्द देखील त्यांनी दिला आहे.

हे सरकारही लवकरच मेगा पोलीस भरती करेल आणि त्यात तरुणांचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार होईल, असा मला विश्वास आहे. (2/2)

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2020

Leave A Reply

Your email address will not be published.