जॉर्ज फ्लॉईड हत्या प्रकरणातील पोलीस अधिकारी दोषी

मिनियापोलिस – जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्‍तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला न्यायालयामध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण अमेरिकेत “ब्लॅक लाईव्ह मॅटर’ नावाचे आंदोलन भडकले होते. डेरेक चोविन नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप सिद्ध झाला असून आता या अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होणे निश्‍चित झाले आहे. डेरेक चोविन याने जॉर्ज फ्लॉईड याच्या मानेवर गुडघा रोवल्याने याचा गुदमरून मृत्यू झाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरलदेखील झाला होता. ही घटना अत्यंत निंदनीय आणि दिवसाढवळ्या झालेली हीन कृती असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष बायडेन यांनी दिली आहे.

मिनीयापोलिसचे प्रमुख मेदारीया आर्यादोंदो यांनी या प्रकरणातील मुख्य साक्ष नोंदवली. आज या प्रकरणाचा निकाल असल्याने न्यायालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमा झाला होता. संपूर्ण देशभरातून या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. आता दोषी पोलीस अधिकाऱ्याला आठ आठवड्यांच्या आत शिक्षा सुनावली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.